नेवासा – शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या मार्फत नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ किशोर धनवटे शब्दगंध चे राज्य सचिव सुनील गोसावी व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी नगरपंचायत नेवासा नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांचा शब्दगंध स्मृतीसह कॅलेंडर पुस्तक देऊन सन्मान केला.

तालुक्यामध्ये शब्दगंध साहित्यिक परिषद अंतर्गत फिरते मोफत वाचनालय हा उपक्रम सुरू आहे शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा मार्फत नेवासे तालुक्यात 22 गावांमध्ये फिरते मोफत वाचनालय चळवळीसाठी उपक्रम राबविण्यात आला आहे गावामध्ये सकाळच्या प्रसन्न वातावरणात जाऊन ग्रामपंचायत किंवा मंदिराच्या समोर कथा कादंबऱ्या धार्मिक व वैचारिक अशा विविध प्रकारच्या पुस्तकांची सुंदर मांडणी केली जाते गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात येते यासाठी सुप्रसिद्ध शाहीर दिगंबर गोंधळी संबळ वाजून वातावरण निर्मिती बरोबर मनोरंजन केले जाते.
शब्दगंध नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर धनवटे हे प्रास्ताविक करून उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देतात. उपाध्यक्ष पांडुरंग रोकडे पुस्तकाची सुबक मांडणी करून नागरिकांबरोबर संवाद साधून त्यांना योग्य ते पुस्तक निवडीसाठी मदत करतात. माजी कुलगुरू व शब्दगंधाचे सल्लागार डॉक्टर अशोकराव ढगे विवेचन करताना विचार मांडतात आज तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जात आहे तसेच वाचनाने मन व बुद्धी टवटवीत होऊन जीवनामध्ये संकटावर मात करता येते पुस्तक हे मस्तक सुधारण्यासाठी योग्य आहे.

वाचनाचे अनेक फायदे विशद करून पुस्तकाचे वितरण करण्यात येते. प्रा डॉ सोनवणे आपल्या खास शैलीत पुस्तकाचे व वाचनाचे महत्त्व सविस्तर सांगतात. या उपक्रमाला नेवासे तालुक्यामध्ये भरभरून प्रतिसाद मिळत असून महिला शेतकरी तसेच तरुण वर्ग व विद्यार्थी उत्साहात सहभागी होतात. नेवासा नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांनी हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद व सामाजिक क्रांतिकारक असल्याचे विशद करून आपण नगरपंचायत मार्फत या उपक्रमाला सर्वोत्तरी बळकटी देऊ आणि हा उपक्रम जास्तीत जास्त गावात पोहोचविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करू व यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ असे आश्वासित केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

