नेवासा – करजगांव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ४६ महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.
भारतीय जनता युवा मोर्चा अहिल्यानगर उत्तर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष महेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ जानेवारी २०२६ रोजी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राजकारणासोबतच सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या महेश पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवला असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अहिल्यानगर येथील पंडित हॉस्पिटल व विघ्नहर्ता मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांच्या विविध आरोग्य समस्यांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे समाजसेवेचा वारसा लाभलेल्या पवार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपली.

या प्रसंगी भाजप वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कोलते, भाजप शहराध्यक्ष मनोजभाऊ पारखे, भाजप जिल्हा सचिव अशोक टेकणे, वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीचे सरपंच ललितशेठ मोटे, भाजप दक्षिण तालुकाध्यक्ष संभाजी जगताप, डॉ. मल्हारी कौतुके, हर्षल आगळे यांच्यासह पंडित हॉस्पिटलचे डॉक्टर व अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्याचे आवाहन “केवळ उत्सवावर खर्च न करता प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवावेत,” असे आवाहन महेश पवार यांनी यावेळी केले. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष स्वागत केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

