ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
महाराज

नेवासा – ज्या मुलांना आई-वडिलांचा नजरेचा धाक आहे ती मुले संस्कारित असतात आणि यशस्वी होतात असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील दिघी येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते.

स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज पुढे म्हणाले की, धर्माच्या बाबतीमध्ये मानव हा आळशी होत चालले आहे. परंतु प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याने धर्माची ताकद जगाला दाखवली. कुंभमेळ्यामध्ये जगभरातील लाखो साधुसंत एकत्र आले. सनातन धर्माची जगाला ताकद दाखवून दिली. त्याच पद्धतीने आपलेही धर्म वाढवण्याचे काम आपल्या हातून झाले पाहिजे.

महाराज

आपला सनातन धर्म हा सर्व सुखाचा विचार करणारा धर्म आहे. आपण जगावं कस हे आपल्याला संतांच्या माध्यमातून शिकायला मिळते, म्हणून संत सहवास हा खूप महत्त्वाचा आहे. जे संत सहवासात असतात त्यांचे जीवन सहजरीत्या जाते .
ज्ञानेश्वरी पारायण केले किंवा ज्ञानेश्वरी ऐकली किंवा वाचली पाठही केली याचे एकच फळ मिळते.

दिघी गावचा भक्ति उत्सव या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर सरिता चालू आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.

पुढील काळामध्ये दिघी गावकऱ्यानी मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करून गावची शोभा वाढवावी असे आव्हान देवस्थानचे महंत गुरुवर्य स्वामी प्रकाशांनंदगिरीजी महाराज यांनी आपले प्रवचनातुन बोलताना सांगितले.

महाराज

ते पुढे म्हणाले की, आपल्या मुलांना एकत्रित छावा चित्रपट दाखवावा, तो चित्रपट पाहून धर्मासाठी आपण कसे एकत्र आले पाहिजे हे त्यातून समजेल व धर्मासाठी कसे लढले पाहिजे हेही त्यातून समजून जेव्हा आपण मंदिराच्या बाहेरच्या आपले अविचार ठेवून मंदिरामध्ये गेलो तर आपण निश्चितच धर्मवाढीचे काम करू शकू.
आपल्या मुलांच्या समोर आपण स्वतः आदर्श पालक म्हणून वागले पाहिजे तेच संस्कार आपल्या मुलावरती पडतात त्यातूनच आपल्या मुलांचे भविष्यकाळ हा उज्वल घडला जातो. तसेच सर्वांनी धर्मकार्यात सहकार्य करावे.

याप्रसंगी सप्ताह कमिटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने स्वामी प्रकाशानंगिरीजी महाराजांचे संत पूजन करण्यात आले. यावेळी दिघे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराज
महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!