नेवासा – नेवासा तालुक्यातील गुरूदेव दत्त पीठ देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या सहा दिवशीय पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शनिवार दि.२२ ते गुरुवार दि. २७ मार्च या कालावधीत हा सोहळा चालणार आहे. या निमित्ताने शनिवारी दि.२२ मार्च रोजी तालुक्यातून येणाऱ्या शेकडो दिंड्यांच्या स्वागतासाठी देवगडनगरी सज्ज झाली आहे. महंत भास्करगिरी बाबांच्या प्रेरणेने व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महोत्सवाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह व महाविष्णू यागासह लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या सुश्राव्य वाणीतून सकाळी श्रीसमर्थसदगुरू किसनगिरी बाबा यांची चरित्र कथा यावर्षी होणार आहे.

पहाटे ४ ते ४.३० मंगलवाद्य सनई वादन, ४.३० ते ६.३० काकडा भजन श्रींची आरती, सकाळी ६.३० ते ७.३० दर्शन प्रदक्षिणा, ७.३० ते ८.३० गितापाठ विष्णूसहस्त्रनाम, ८.३० ते ११.३० श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा जीवन चरित्र कथा, दुपारी १२.३० ते १.३० भोजन, १.३० ते ३ यावेळेत गुणवंतांचे कार्यक्रम, ३ ते ५ श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांचीचरित्र कथा, सायंकाळी ५.३० ते ७ हरिपाठ व श्रींची आरती दर्शन, रात्री ७ ते ८.३० भोजन, रात्री ८.३० ते १०.३० यावेळेत कीर्तन तदनंतर शेजारती रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ग्रामस्थांचा जागर होणार आहे. रात्री ८.३० ते १०.३० महोत्सवात तुकाराम महाराज, सुदामदेव महाराज, विश्वनाथगिरी महाराज, अंकुश महाराज जगताप नेवासा, हरिशरणगिरी महाराज बाजाठाण यांचे कीर्तन होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.