ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
हाणामारी

नेवासा – तालुक्यातील मुकिंदपूर (नेवासाफाटा) येथे शेजारी-शेजारी टपऱ्या असलेल्या दोन व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली असून याबाबत दाखल परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अभिजीत संजय निपुंगे (वय ३०) धंदा शेती रा मुकिंदपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी विरांश वाईन शॉप नेवासा फाटा शेजारी छोटी टपरी असून माझ्या टपरीचे शेजारी अक्षय धर्मा भोंगाळ यांची टपरी आहे, आमच्या टपऱ्या शेजारी शेजारी असल्याने आमच्यात वाद आहेत. १५ मार्च रोजी दुपारी १२.३० वा च्या सुमारास माझा चुलतभाऊ अदित्य दत्तात्रय
निपुंगे हा मोटार सायकलवर अर्चना हॉटेल समोरुन जात असताना त्याला अक्षय धर्मा भोंगाळ व ओम गवळी यांनी आवाज देवून थांबविले व तू विरांश वाईन शॉपी जवळ असलेली टपरी बंद कर असे म्हणून शिवीगाळ करू लागला, त्यावेळी माझा भाऊ त्यास समजावून सांगत असताना त्यांनी माझ्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.

हाणामारी

त्यानंतर १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मी माझे विरांश वाईन शॉपी नेवासा फाटा येथे असलेली टपरी उघडली असता माझ्या टपरीच्यासमोर अक्षय धर्मा भोंगाळ, ओम गवळ, अतुल अनिल पेचे, स्वप्निल गवळी,समर्थ गवळी व दोन अनोळखी ईसम असे आले व मला तू टपरी का उघडली असे म्हणून शिवीगाळ करू लागले त्यावेळी मी त्यांना समजावुन सांगत असताना त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच स्वप्निल गवळी याने दांडक्याने व समर्थ गवळी याने बिअरच्या बाटलीने मला मारहाण करुन दुखापत केली. त्यावेळी माझे चुलते दत्तात्रय नारायण निपुंगे हे मला सोडविण्यासाठी आले असता, त्यांना देखील अतुल पेचे, ओम गवळी, समर्थ गवळी स्वप्निल गवळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत टपरी उघडली तर जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. तसेच त्यांनी माझा टपरीमधील फ्रिांज फ़ोडून फ्रिजचे तसेच फ्रिांज मधील मालाचे नुकसान केले. या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाणामारी

दुसरी फिर्याद अक्षय धर्मा भोंगाळ (वय २९) धंदा किराणा दुकान, रा खडका फाटा यांनी दिली असून त्यात म्हटले की, माझ्या दुकानाच्या शेजारी अभिजीत संजय निपुंगे याची देखील टपरी आहे. आमचे दुकान शेजारी शेजारी असल्याने अमच्यात वाद आहेत. तसेच मी अभिजीत निपुंगे याला हातउसणे ७७ हजार रुपये दिलेले आहेत.त्यांने अद्याप पावेतो मला माझे पैसे दिलेले नाहीत १५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मी नेवासा फाटा येथून त्रिमूर्ती शाळेकडे जात असताना अर्चना हॉटेलच्यासमोर अभिजीत संजय निपुंगे, आदित्य दत्तात्रय निपुंगे दोन्ही रा मुकिंदपूर यांनी मला आवाज दिला. त्यामुळे मी थांबलो असता अभिजीत संजय निपुंगे हा मला तुला जास्त झाले आहे. तू मला पैसे का मागितले? असे म्हणाला. त्यावेळी मी त्यास समजावून सांगत असताना अभिजीत निपुंगे याने मला त्याच्या हातातील कड्याने व अदित्य निपुंगे याने मला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

हाणामारी

त्यावेळी माझा मित्र ओम शिवाजी गवळी हा मला सोडविण्यासाठी मध्ये आला असता त्याला सुद्धा वरील दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मी माझे विरांश वाईन शॉपी शेजारी असलेल्या टपरीमध्ये असताना अभिजीत संजय निपुंगे हा आला व माझा मित्र अतुल अनिल पेचे व समर्थ शिवाजी गवळी यांना शिवीगाळ करु लागला म्हणून मी मध्ये सोडविण्यासाठी गेलो असता अभिजीत निपुंगे याने आंम्हाला शिवीगाळ करून त्याच्या हातातील दांड्याने मित्र समर्थ गवळी यास मारहाण केली म्हणून माझी अभिजीत निपुंगे व अदित्य दत्तात्रय निपुंगे दोन्ही रा. मुकिंदपूर यांच्याविरुद्ध फिर्याद आहे. या फिर्यादीवरुन वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हाणामारी
हाणामारी
हाणामारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हाणामारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!