नेवासा – वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय जगात दुसरा नाही. जगात सर्व गोष्टींना माफी आहे परंतु कर्माला माफी नाही. कर्म हाच देव असल्याने जीवनात नीट वागा. संपत्ती कमावताना गरिबांचा तळतळाट कधी घेऊ नका. शरीर चांगले आहे, तोपर्यंत परमार्थ करा. खरा स्वर्ग अनुभवयाचा असेल तर हसत जगण्याचा प्रयत्न करा. देव एक ना एक दिवस देणार आहे. त्यासाठी परमार्थ साधना चालू ठेवा, जगात महान असलेल्या वारकरी संप्रदायाची उंची वाढवा, असे आवाहन हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.

नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकरी संप्रदायातील सेवेकरी स्व. राधाबाई हजारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तन सोहळयाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी आयोजक सुभाष हजारे, दत्तात्रय हजारे, लक्ष्मण पेहरे यांनी आलेल्या आलेल्या भाविकांचे स्वागत केले. हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्याहस्ते हभप इंदोरीकर महाराज यांच्यासह उपस्थित संत-महंतांचे संतपूजन करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.