महालक्ष्मी हिवरे

सोनई – तारकेश्वर गडाचा मोठा धार्मिक परंपरा लाभलेल्या नारळी सप्ताहाचे धर्मध्वजारोहनशुक्र दि 14 मार्च 2025 रोजीमहालक्ष्मी हिवरे येथे तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलतांना महंत आदिनाथ शास्त्री महाराज म्हणाले महंत नारायण महाराज यांनी गावा,गावात धार्मिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली आहे. यास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. दरवर्षी हा सप्ताह वेगवेगळ्या ठिकाणी भाविक आयोजित करतात महालक्ष्मी हिवरे ता नेवासा येथे 47 वा नारळी सप्ताह होतो आहे हे गावाचे भाग्य आहे.धर्म जागृतीसाठीसप्ताह परंपरा आवश्यक आहेगोमातेच्या व धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले. सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे महाराज म्हणाले.

महालक्ष्मी हिवरे

रवी 30 मार्च ते रवी 6 एप्रिल या कालावधीत महालक्ष्मी हिवरे येथे नारळी सप्ताह संपन्न होणार असुनसकाळी व संध्याकाळी महाराष्ट्रातीलनामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सेवा संपन्न होणार असूनतसेच 2 एप्रिल रोजी नामवंत व्यख्याते गणेश शिंदे यांचे व्यख्यान होणार आहे.6 एप्रिल 2025 रोजी महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनानेसप्ताहाची सांगता होणार आहेसप्ताह काळात लाखो भाविक भेट देणार असूनत्यादृष्टीने सप्ताहाच्या ठिकाणचेकामे प्रगतीपथावर आहेत यासाठी महालक्ष्मी हिवरे ग्रामस्थ व भाविक एकवटले आहेत.

महालक्ष्मी हिवरे

सप्ताह सांगते प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेट देणार आहेत. धर्म ध्वजारोहन प्रसंगी अनिल घुले सरपंच माका, सुनील लंघे,बंडू मुंगसे सरपंच देडगाव,अंबादास आव्हाड,देविदास आव्हाड,संभाजी गर्जे सरपंच अकोला आदींसह वारकरी मंडळी महालक्ष्मी हिवरे ,माका, देडगाव परिसरात ग्रामस्थ नारळी सप्ताह कमिटी सदस्यमोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कारभारी गायके यांनी केले


सप्ताह काळात 24 तास उपस्थित लाखो भाविकांना अखंड अन्नदान केले जाणार आहे.

महालक्ष्मी हिवरे
महालक्ष्मी हिवरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महालक्ष्मी हिवरे
महालक्ष्मी हिवरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महालक्ष्मी हिवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!