नेवासा – नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेवासे येथील जनता गॅरेज संघाने बाल्स्टर संघाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. संघनायक अमन शेख याने ११ चेंडूत धडाकेबाज ३८ धावांची चौफेर फटकेबाजी करीत विजयाचा शिल्पकार ठरला. मुळा साखर कारखान्याच्या मैदानावर काल शनिवारी व आज झालेला उपांत्य फेरीचे सामने अतिशय चुरशीचे व धावांचा पाऊस पाडणारे ठरले. बाल्स्टर संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांत अवघ्या ४४ धावा केल्यानंतर मैदानात उतरलेल्या संघनायक शेख याने मैदानाच्या सर्व बाजूला चेंडूला भिरकावत विजय सोपा केला.

तीन षटक व दोन चेंडूत विजयाचा बार उडाला. विजयी फटका मारताच संघमालक धनंजय काशिद व चाहत्यांनी मैदानात धाव घेऊन सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेत प्रथम ५५ हजार रुपये व चषक जनता गॅरेज संघास देण्यात आले. दुसरे ३५ हजार रुपये व चषक ब्लास्टर संघास देण्यात आले. तिसरे संघर्ष कांगोणी तर चौथे बक्षीस सोनई येथील डॉ. पवार संघास देण्यात आले. आयोजन कमेटीचे प्रमुख उदय पालवे व सदस्यांनी मान्यवरांचा सत्कार केला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून शुभम ताके तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पापा शेख यांना बक्षीस देण्यात आले. पंच म्हणून दीपक पिळगावकर, अजित पंडित व विनायक पाटील होते तर शेरखान व शाहरुख पठाण यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे समालोचन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.