नेवासा – उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सर्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र सरकार यांनी काढलेल्या अतिक्रमण काढण्याच्या नोटिषीस स्थगिती दिली. घोडेगाव ते मिरी या प्र. जिल्हा मार्ग या रस्त्याच्या अतिक्रमणासंबंधी सर्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 20. 2.2025 रोजी येथील रहिवासी व व्यावसायिक यांना नोटीसा काढल्या होत्या. सदर नोटिसांच्या विरोधात घोडेगाव येथील डॉ. पद्माकर पांडुरंग भालेराव, तसेच व्यावसायिक श्री. राहुल मनसुखलाल नहार व श्री. सचिन सुभाष दारकुंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून स्थगिती आदेश पारित केला. सदर कायदेशीर बाबी संदर्भात ॲड.मनोज हारदे ,ॲड. आदिनाथ जगताप व ॲड. अशोक करडक यांनी याचिकाकर्त्याची बाजू कोर्टासमोर मांडली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.