ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शिवजयंती

नेवासा फाटा – नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करत त्यांच्याप्रती निष्ठा व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. राजूभाऊ उंद्रे, विजुभाऊ गाडे, बादल परदेशी, कृष्णा परदेशी, अनिल परदेशी, पत्रकार संभाजी पठाडे, गणपतराव मोरे, सुशील धायजे, पोलीस पाटील आदेश साठे, माधव नन्नवरे, या समस्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

शिवजयंती

या वेळी मान्यवरांनी शिवचरित्रावर प्रेरणादायी विचार मांडले आणि शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्श नेतृत्वावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघटना आणि प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.

तसेच या कार्यक्रमाप्रसंगी बाळू लिपाणे, बबलू साळवे,गोटू पडोळ,विकास विटकर,बंडू परदेशी, उत्तम विटकर , आबासाहेब शिरसाट,गणेश झगरे, राहुल बंदिवान, दत्तू हिवरे, बाळू मैदाड, संदीप सोनवणे, शेषराव गव्हाणे, सागर गायकवाड ,पिंटू चव्हाण, सह आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंती
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!