नेवासा – अयोध्येतील राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कामे वेगाने सुरु आहेत. रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण केली जात आहे. राममंदिराच्या निर्मितीची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे आहे. मंदिराचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. या मंदिरासाठी मागील पाच वर्षांत ४०० कोटी रुपयांचा कर सरकारला भरला आहे. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी ही माहिती दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची मणिराम दास छावणीमध्ये बैठक झाली. त्यानंतर चंपत राय यांनी ही माहिती दिली.

असा झाला खर्च श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ७ ट्रस्टी आणि ४ विशेष आमंत्रित सदस्य उपस्थित होते. विशेष आमंत्रित म्हणून केशव पराशरण, विमलेंद्र मोहन मिश्र, युगपुरुष परमानंद, नृपेंद्र मिश्र उपस्थित होते. बैठकीत राममंदिराच्या निर्मितीच्या प्रगतीवर चर्चा झाली. महामंत्री चंपत राय यांनी सांगितले की ५ फेब्रुवारी २०२० रोजी ट्रस्टची निर्मिती झाली होती. २८. फेब्रुवारी २०२५ पर्यंत म्हणजे गेल्या ५ वर्षांत ट्रस्टच्या खात्यातून सरकारच्या विविध विभागांना ३९६ कोटी रुपयांचा कर दिला आहे.

ट्रस्टने जीएसटी २७२ कोटी, टीडीएस ३९ कोटी, लेबर सेस १४ कोटी, ईएसआय ७.४ कोटी, विमामध्ये ४ कोटी, जन्मभूमीच्या नकाशासाठी अयोध्या विकास प्राधिकरणला ५ कोटी, अयोध्येतील जमीन खरेदीसाठी स्टँप शुल्क २९ कोटी, १० कोटी वीज बिल, १४.९ कोटी रॉयल्टच्या माध्यमातून सरकारला दिले गेले आहे. त्यात दगडांची रॉयल्टी राजस्थान सरकार, कर्नाटक सरकार, मध्यप्रदेश सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारला दिली आहे. ५ वर्षांत मंदिर निर्मितीवर २१५० कोटी रुपये खर्च झाले आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.