नेवासा – शनिवार दि. २२ मार्च रोजी श्रीक्षेत्र गोदाधाम सरालाबेट येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज यांची १६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी १० वाजता मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यावर्षीही सद्गुरू नारायणगिरी महाराज यांची १६ वी पुण्यातिथी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात
भक्तीभावाने साजरी करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने शनिवारी सकाळी १० वाजता महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन होईल. किर्तनानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्यावतीने पुरणपोळी तसेच येवला, नांदगाव तालुक्यातील भक्तमंडळीच्या वतीने मांडे, दुध, आमटी अशा महाप्रसाद परांती होईल. तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सद्गुरू गंगागिरी महाराज ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.