सोनई –नेवासा तालुक्यातील मोठे धार्मिक व ऐतिहासिक महत्व लाभलेलेव स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेवासा श्रीरामपूर मतदार संघाच्या आमदारकीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभलेले स्वातंत्र्यसौनिक स्व भावराव गोविंदराव चौगुले,व इंग्रजांच्या विरोधात लढा उभारणारे आदिवासी योध्ये काळू नाईक यांचे गाव असलेले, जागृत देवस्थान रोकडोबा हनुमान व श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रसिद्ध मंदिर असलेले बेलपिंपळगाव नेवासा तालुक्यातील एक प्रगतिशील गाव म्हणून ओळखले जाते. बेलपिंपळगाव गावात स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारदरा धरणाचे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी इंग्रजांचे पाटबंधारे कार्यालय व वसाहत होती त्याचे अवशेष आजही पाहण्यास मिळतात.

त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांनी गावात प्रवेश करण्याच्यारस्त्यावर बेलपिंपळगाव फाट्या लगत रस्त्याच्या दुतर्फा20 वटवृक्षांचे तसेच 28 कडुनिंबाच्या झाडांची लागवड केलीअसून एकूण 48 झाडे असूनया झाडांची रस्त्यावर गर्द सावली आहे रस्त्यावरून जाणारेवाटसरू आवर्जून या वनराईच्या खाली विसावतातया निसर्ग संपदेचे तोंडभरून कौतुक करतात. गावची ओळख असलेली व गावाची अनेक पिढ्याची साक्षीदार असलेली ही वनराईची जपवणूक व्हावी या उद्देशाने बेलपिंपळगावचे सरपंचकृष्णा शिंदे यांनी पुढाकार घेऊनझाडांना वाळवी लागू नये झाडांचे खोड व बुंधेकार्यक्षम रहावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोडांवर गेरू व चुना व औषध यांच्या मिश्रणाचे लेपनआकर्षक पद्धतीने केले .

यासाठी गावातील तरुणांचे सहकार्य व जेष्ठांचे मार्गदर्शन घेतले.तसेच वडाच्या रस्त्यावर आलेल्या पारंब्यावर येणारे जाणारे वाहने जाऊन त्या दुखावत होत्या व वाहतुकीस अडथळा ठरत होत्या त्या पारंब्याचे योग्य व्यवस्थापन केले.यामुळे वटवृक्षांचे आयुर्मान वाढणार असून गावाचा अनेक पिढ्यांचा ठेवा असलेले वटवृक्ष अबाधित राहणार आहेत. सरपंच कृष्णा शिंदे यांनी पुढाकारानेगावचे वनवैभव जपले व गाव सदाहरित ठेवण्यास महत्वाचे पाऊल उचलले याबद्दलग्रामस्थांकडून त्यांचे व सर्व सदस्यांचे अभिनंदन होत आहे..

अनेक पिढ्यांचे साक्षीदार असलेले वटवृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी पुढाकार घेतला यामुळे गावाची ओळख असलेले वटवृक्ष अबाधित राहणार आहे यापुढेही निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेणार.
– कृष्णा शिंदे, सरपंच बेलपिंपळगाव..

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.