नेवासा – नेवासा तालुक्यात शाळा, महाविद्यालय, उद्याने ,मंगल कार्यालय याठिकाणी स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक मोठा वृक्षारोपण कार्यक्रम इच्छा फाउंडेशन लवकरात लवकर आयोजित करणार असून या कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी होऊन निसर्गप्रेमींनी मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ‘इच्छा फाउंडेशन’ या संस्थेच्या अध्यक्षा मनीषा देवळालीकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

तसेच इच्छुक निसर्गप्रेमींनी IFSC CODE- SBIN0007309 आणि 38476323825 या खाते क्रमांकावर आपली देणगी पाठवावी असे आवाहन अध्यक्षा देवळालीकर यांनी केले.’ इच्छा फाउंडेशन’ तर्फे याआधीही नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटप आदी प्रकारचे अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले असून वृक्षारोपण कार्यक्रमालाही असाच प्रतिसाद मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे सचिव ज्ञानेश सिन्नरकर ,उपाध्यक्ष विशाल देवळालीकर, सदस्य सतीश निपुंगे, राम कुंडारे, गणेश चरभरे ,पुष्पलता मोरे आदि निसर्गप्रेमी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.