सोनई – माजी खा यशवंतराव गडाख यांच्या नात व उद्योजक विजयराव व सौ निलांगी गडाख यांच्या कन्या
प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर रुकमा पवार गडाख यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण व रचनात्मक डिझायनर शैलीला डिझायनर क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 30 अंडर 30 रायजिंग अँड क्रिएटिव्ह इंटिरियर डिझायनर ऑफ द इयर 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार तसेच त्यांच्या इंटिरियर डिझाईन फर्मला ट्रेंडसेंटर ,नुकताच समारंभपूर्वक नाशिक येथे प्रदान करण्यात आला. रुकमा पवार गडाख यांनी अगदी अल्पावधीतच डिझाइन क्षेत्रात आपल्या कलेची छाप सोडली आहे.

सध्या त्या नाशिक, पुणे,ठाणे,अहिल्यानगर येथे महत्वाकांशी प्रकल्पावर त्या काम करत आहेत. आपण समाजाच देणं लागतो या भावनेतुन मी नावीन्यपूर्ण प्रयोग या क्षेत्रांत करत असते. आजवरच्या प्रवासात पती शेखर पवार व सासरे डॉ ज्ञानेश्वर पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. असल्याचे रुकमा गडाख पवार यांनी आवर्जून सांगितले. यशाबद्दल रुकमा पवार गडाख यांचे
माजी खा यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे..


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.