ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

दिघी कार्यकारी सोसायटीची निवडणूक आज संपन्न झाली त्यामध्ये शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपान नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे यांची निवड करण्यात आली.

या निवडणुकीला सोपानराव नागवडे यांना सूचक म्हणून दत्तात्रय दळवी हे होते तर अनुमोदक गोवर्धन काळे हे होते. तसेच व्हाईस चेअरमन पदी निवड झालेले रावसाहेब नागवडे यांना सूचक म्हणून शिवाजीराव बरवे तर अनुमोदक म्हणून शोभा सुनील निकम ह्या होत्या.

ही निवडणूक चेअरमन पदासाठी तेरा जागांसाठी घेण्यात आली तसेच व्हॉइस चेअरमन पदासाठी ही 13 जागांसाठी घेण्यात आली त्यामध्ये चेअरमन पदी विराजमान झालेले सोपानराव नागवडे यांना १३ पैकी ८ मते मिळाली तर व्हाईट चेअरमन पदी विराजमान झालेले रावसाहेब नागवडे १३ पैकी ९ मते मिळाली.

शेतकरी

यांच्या विजयानंतर दीघी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी या निवडी प्रसंगी सोसायटी संचालक गोवर्धन काळे, मच्छिंद्र गवळी, दत्तात्रय दवळी, शोभा सुनील निकम, शिवाजी बर्वे, शिवाजी नागवडे ,

दत्तात्रय लक्ष्मण निकम, सर्जेराव गवळी, बाबासाहेब सुखदेव नागवडे, दत्तात्रेय एकनाथ नागवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.

तसेच दिघी ग्रामस्थ आदिनाथ निकम ,शिवाजी निकम, कैलास नागवडे, कैलास सुखदेव नागवडे, बाबासाहेब नागवडे, संजय नागवडे, सुनील निकम, बाबू चव्हाण, बाळासाहेब काळे, पोपटराव नागवडे, भाऊसाहेब नागवडे, सचिन सोपान नागवडे ,चंदू भगत, देविदास नागवडे , अशोक निकम ,नंदू नागवडे ,रामेश्वर राजेंद्र नागवडे, भाऊसाहेब ब्राह्मणे ,पप्पू भगत, गणेश नागवडे आदि गावचे ग्रामस्थ सोसायटी सभासद सदस्य मोठ्या संख्येने या निवडी प्रसंगी उपस्थित होते.

शेतकरी

तसेच सर्व ग्रामस्थांच्यावतीने माजी चेअरमन दत्तात्रेय निकम यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच निवड झालेले चेअरमन पदी विराजमान झालेले सोपान नागवडे व व्हॉइस चेअरमन पदी निवड झालेले रावसाहेब नागवडे यांची सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण कामकाज वनवे साहेब यांनी बघितले.

सचिव संभाजी चावरे तसेच क्लर्क गोवर्धन ताकवने त्यांच्या वतीने सोसायटीचे कामकाज बघितले जाते.

newasa news online
शेतकरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेतकरी
शेतकरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *