नेवासा – हिंदू नववर्षाचे औचित्य साधून श्रीराम नवमीच्या निमित्ताने नेवासा येथील जुन्या पेठेजवळ असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीमद दासबोध ग्रंथाच्या पारायणासह हभप बाळासाहेब महाराज नाईक यांच्या सुश्राव्य वाणीतून रामचरित मानस कथा सोहळयाचे आयोजन दि.३० मार्च गुढीपाडव्यापासून दि.६ एप्रिल रामनवमी या कालावधीत करण्यात आले आहे.या सोहळयाची जय्यत तयारी येथे सुरू आहे.
रविवारी दि.३० मार्च गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या सोहळयामध्ये श्रीराम मूर्तीस रुद्राभिषेक तर दि.३१ मार्च ते दि.५ एप्रिल या कालावधीत सकाळी ७ ते ११ दासबोध पारायण श्री क्षेत्र जांब समर्थ येथील श्री समर्थ भक्त माणिकराव राठोड यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली होणार आहे.या पारायणामध्ये युथ सोशल फोरमच्या वतीने वाचकांना दररोज नाष्टयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

याच कालावधीत श्री क्षेत्र जांब समर्थ येथील हभप बाळासाहेब महाराज नाईक यांच्या सुश्राव्य वाणीतून दुपारी २.३० ते सायंकाळी ६ .३० यावेळेत संगीत रामचरित मानसकथा होणार आहे.तसेच वरील कालावधीतच दि.३० मार्च रोजी सायंकाळी ७ ते ८.३० यावेळेत संगीत विशारद कृष्णा कुलकर्णी यांचा गीतांजली,सोमवारी दि.३१ मार्च रोजी स्वाध्याय परिवाराचे जनक परमपूज्यनिय पांडुरंग शास्त्री आठवले(दादाजी) यांचे व्हिडिओ प्रवचन,मंगळवारी दि.१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ८यावेळेत “रामगावा”हा स्वर माधुरी गायन ग्रुपचा भक्ती संगीतांचा कार्यक्रम सौ.माधुरीताई कुलकर्णी सादर करणार आहे. बुधवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ८.३० यावेळेत सौ.माधुरीताई कुलकर्णी यांचे नारदीय किर्तन,शुक्रवारी दि.४ एप्रिल रोजी सायंकाळी ७. ते ८.३०
यावेळेत कृष्णा डहाळे यांचा अभंग वाणी हा भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल.

शनिवारी दि.५ एप्रिल रोजी दासबोध ग्रंथ मिरवणूक होईल.रविवारी दि.६ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२.३०यावेळेत श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने हभप बाळासाहेब महाराज नाईक यांचे जन्मोत्सवावर किर्तन व तदनंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. श्री राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने रविवारी दि.६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत दीपोत्सव व महाआरती सोहळा साजरा होणार असून याच दिवशी रात्री ९ वाजता राजेंद्र परदेशी यांचा व सहकाऱ्यांचा “एकतारी”भजनाने कार्यक्रमाने श्री राम जन्मोत्सव सोहळयाची सांगता होणार आहे.पंचक्रोशीतील भाविकांनी नेवासा येथील श्रीराम मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थान स्ट्रस्ट व श्रीराम भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.