नेवासा : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त नेवासा येथील आयोजित रक्तदान शिबिरात ४५ युवकांनी रक्तदान केले. श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नेवासा तालुका व सकल हिंदु समाज नेवासा तालुका यांनी श्री.काशीविश्वेश्वर मंदिर प्रांगणात सोमवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.यावेळी अहिल्यानगर रक्तकेंद्रचे वैद्यकीय अधिकारी तसेच शहरातील सकल हिंदू समाजाचे युवक उपस्थित होते. रक्तदान शिबिर प्रारंभ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रेरणा मंत्र,श्र्लोक,प्रतिज्ञा,ध्येय मंत्र घेण्यात आले. रक्तदात्यांना धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र पुस्तक भेट देण्यात आले.

धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास २८ फेब्रुवारी पासुन सुरु झाले असुन दररोज सायंकाळी साडेसात वाजता शहरातील दुर्गादेवी मंदिर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.धर्मवीर संभाजी सूर्योदय मंत्राचा पाठ करण्यात येतो.काही पद्य घेण्यात येतात या कालावधीत अनेक युवकांनी धर्मवीर संभाजी महाराज यांची आठवण म्हणून चहा,चप्पल,आवडत्या पदार्थांचा त्याग केला आहे.दि.२९ मार्च सायंकाळी पाच वाजाता धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनी शहरातुन मुक पदयात्रा काढण्यात येणार आहे .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.