सोनई – शनी दि 29 मार्च 2025 रोजी शनिशिंगणापूर येथे शनी अमावस्या निमित्त होणाऱ्या यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता संभाव्य गर्दीच्या दृष्टीने भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यात्रा उत्साही वातावरणात पार पडावी यासाठी
बुध दि 26 मार्च 2025 रोजी श्री शनिश्वर देवस्थान ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक संपन्न झाली. तीव्र उन्हामुळे भाविकांना गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या रस्त्याच्या तिन्ही बाजुंनी भाविकांच्या वहानाच्या पार्कींगची व्यवस्था
अर्धा किमी अंतराच्या आत शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत केली असल्याचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले.

यामध्ये छत्रपती संभाजीनगरहुन येणाऱ्या भाविकांची पार्कींग व्यवस्था रमेश बानकर यांच्या जमिनीत केली असून राहुरी मार्गे येणाऱ्या भाविकांची पार्कींग व्यवस्था नवनाथ शेटे व सरपंच बाळासाहेब बानकर यांच्या खासगी जमिनीत केलेली आहे तर घोडेगावमार्गे शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाकडून येणाऱ्या भाविकांच्या पार्कींगची व्यवस्था वाघ यांच्या खासगी जमिनीत केली असल्याचे देवस्थानच्या सांगण्यात आले. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था नियोजन ,पिण्याचे पाण्याची व्यवस्था, बस व्यवस्था, स्वच्छता नियोजन ,आरोग्य व्यवस्था ,विद्युत पुरवठा याबातीत योग्य प्रकारे कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करण्याबाबद चर्चा झाली.

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर,प्रांताधिकारी सुधीर पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,शनिशिंगणापूरचे स पो नी आशिष शेळके,सोनईचे स पो नी विजय माळी, निवासी नायब तहसीलदार बोरुडे,चिटणीस आप्पासाहेब शेटे,विश्वस्त डॉ शिवाजीराव दरंदले,छबुराव भुतकर, कार्यकारी अधिकारी जी के दरंदले,उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे,जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले,सचिन बेल्हेकर, देवस्थानचे विभाग प्रमुख, विविध खात्याचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते

उन्हाची तीव्रता लक्षात घेता यावर्षी प्रथमच शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात प्रवेश करणाऱ्या तिन्ही रस्त्यांची वाहन पार्कींग अर्धा किमीच्या आत करून भाविकांना सुखद धक्का देवस्थानने दिला आहे.
भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शनी दि 29 मार्च 2025 रोजी पहाटे पासून सायंकाळ पर्यत चौथऱ्यावरील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे असे देवस्थान प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.