कारखान्याच्या संचालिका डॉ.सौ.ममता शिवतारे (लांडे)यांची माहिती
नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड माळेवाडी दुमला या साखर कारखान्याने चाचणी गणित हंगामात शेतकऱ्याच्या ऊसाला प्रति मॅट्रिक टन २८०० रुपये प्रमाणे भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चाचणी गळीत हंगामात शेतकऱ्याची ऊस बिलाची रक्कम दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत बँक खात्यावर जमा केली आहे त्यामुळे शेतकऱी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे तसेच शेतकरी वर्गाकडून कारखाना व्यवस्थापकांचे व चेअरमनचे अभिनंदन करण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे प्रादेशिक संचालक साखर आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्याचे बिल अदा केलेले एफ.आर.पी बिल दर पंधरवड्यामध्ये वेळोवेळी माहिती कारखाना व्यवस्थापकाकडून सादर केली आहे.
परंतु कारखान्याचे प्रतिनिधी अनवधानाने दिनांक १७/०३/२०२५ रोजी बोलवलेल्या मीटिंगमध्ये काही कारणास्तव पोहोचू न शकल्यामुळे मा. साखर आयुक्त यांच्या सुनावणीनुसार जप्तीच्या आदेशाच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले होते.

परंतु तसे नसून कारखान्याने अग्रेसर राहून दिनांक १५/०३/२०२५ पर्यंत ऊस बिलाची रक्कम ९०% शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केली असून केवळ मीटींगला हजर न राहिल्याने चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे संचालिका डॉ.सौ ममताताई शिवतारे (लांडे) यांनी साखर आयुक्तांना स्वतः समक्ष हजर राहून पत्राद्वारे दिली आहे अशी माहिती त्यांनी पत्रका द्वारे प्रसिद्ध केली आहे .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.