नेवासा – देहु आळंदी प्रमाणेच नेवासा येथून परिसरातील सर्व दिंड्यांची एकत्रित ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीतून ज्ञानेश्वर माऊलीचा या आषाढीला भव्य पालखी सोहळा निघणार असून यामुळे नेवासा तीर्थक्षेत्र मोठे वैभव प्राप्त होईल यासाठी सर्व संत महात्म्यांनी सहकार्य करण्या चे आवाहन ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त ह भ प देविदास महाराज मस्के यांनी केले आहे
ज्ञानेश्वरी लिखाणस्थान संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची जन्मभूमी असलेल्या नेवासा येथील पैस खांबाला वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठे स्थान आहे या ठिकाणी महाराष्ट्र सह भारत वर्षातील वारकरी वर्षातून एकदाका होईना येऊन पैस चरणी नतमस्तक होत असतो

नेवासा तालुका ही संतांची भूमी आहे एकट्या नेवासा तालुक्यातून 119 गावातून सुमारे 130 दिंड्या पंढरपूरला जात असतात या दिंड्यांच्या परंपरेत दिवसेंदिवस वाढच होत आहे वारकरी संप्रदायातील सर्वात मानाची स्थान असलेले विठ्ठल आश्रम गंगापूर येथील रामभाऊ महाराज राऊत यांनी आळंदीप्रमाणे नेवासा येथून माऊलीची पालखी निघावी व त्यात परिसरातील सर्वच दिंड्यांनी सहभागी व्हावे असा विचार मांडला
आज या उपक्रमा बाबतीत परिसरातील दिंडी चालक आणि देवस्थानांचे प्रतिनिधींची नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिरात बैठक झाली बैठकीचे अध्यक्षस्थानी रामदेव महाराज राऊत होते तर या बैठकीला ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे विश्वस्त देविदास महाराज मस्के यांनी मार्गदर्शन केले ज्ञानेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनातच सदरच्या पालखी सोहळ्याच्या आयोजन केले जाणार असल्याने ज्ञानेश्वर मंदिराच्या विश्वस्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे

सदरच्या पालखी सोहळ्याच्या पुढील नियोजनासाठी मंदिरांचे विश्वस्तांसह पालखी सोहळ्यात सामील होणार असलेल्या दिंड्यांचे चालक चौदा एप्रिल रोजी नेवासा ते पंढरपूर जाऊन सर्व मार्गाचा सर्वे करणार आहे त्यामध्ये कोठे कोठे मुक्काम घ्यायचा त्यासाठी काय काय नियोजन करावे लागेल याची पूर्वतयारी करण्यात येणार आहे
आज झालेल्या बैठकी नंतर देविदास महाराज मस्के यांनी सदरच्या पालखी सोहळ्याची जबाबदारी ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान घेत असून हा सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पूर्ण होण्यासाठी परिसरातील सर्व दिंडी मध्ये जाणारे भाविकांनी सहभागी व्हावे व सहकार्य करावे असे आवाहन केले

आजच्या बैठकीला रामभाऊ महाराज राऊत देविदास महाराज मस्के यांच्यासह ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग विश्वस्त विश्वास मामा गडाख, ज्ञानेश्वर माऊली शिंदे नंदकुमार खरात महाराज, गहिनीनाथ आढाव महाराज नजन महाराज, कैलास जाधव कृष्ण भाऊ पिसोटे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे व परिसरातील अनेक दिंड्याच्यालक व भावीक उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.