नेवासे नगरपंचायतीने ९० लाख रुपयांच्या खर्चातून सुविधा केली निर्माण
नेवासा – नेवासे नगरपंचायतीने प्रथमच अग्निशामक दलाची स्थापना करत अग्निशामक गाडी खरेदी केली. नगरपंचायत स्थापन होऊन आठ वर्षे उलटली असताना प्रथमच ही सुविधा उपलब्ध झाली असून, यामुळे परिसराला आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळणार आहे.
यापूर्वी नेवासे शहर व परिसरात आग लागल्यास भेंडा साखर कारखाना, मुळा साखर कारखाना, अशोक साखर कारखाना तसेच श्रीरामपूर आणि राहुरी नगरपालिकांच्या अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागत असे. मात्र, यामुळे वेळेत मदत मिळणे कठीण व्हायचे. नगरपंचायत स्थापन झाल्यापासून स्थानिक पातळीवर अग्निशामक दल असावे, अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत होती.

आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नगरपंचायतीने स्वतंत्र अग्निशामक दल स्थापन केले. नगरपंचायतीने सुमारे ९० लाख रुपये खर्च करून अग्निशामक गाडी खरेदी केली आहे. त्यावर दोन कर्मचारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण निधीमधून नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. या नव्या सुविधेमुळे नेवासासह परिसरातील १० किलोमीटरच्या पट्ट्यात तातडीने अग्निशामक सेवा मिळणार आहे. नेवासा शहरात विविध भागांमध्ये गॅस सिलेंडर गळती, शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगीच्या घटना पूर्वी घड लेल्या आहेत. परंतु, अद्याप स्वतःचे अग्निशमन दल नसल्याने मदतीसाठी बाहेरील यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत होते. परिणामी, अनेक वेळा मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असे. नव्या यंत्रणेच्या स्थापनेमुळे हे संकट व काही प्रमाणात टळणार आहे.

अग्नीशमन दलासाठी सेंटरची उभारणी सुरू
नेवासे नगरपंचायतीने प्रथमच अग्निशामक दलाची गाडी खरेदी केली असून अग्निशामक दलासाठी नवीन सेंटर उभारणी चालू आहे. त्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, असे नेवासे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सोनाली मात्रे यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

