
नेवासा फाटा – श्रीराम जन्म सोहळयाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील मुकींदपूर शिवारातील श्रीराम साधना आश्रम रामनगर येथे दि.३० मार्च ते दि.७ एप्रिल २०२५ या कालावधीत होणाऱ्या संगीतमय भागवत कथा,गाथा पारायण व किर्तन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून दि.३० मार्च पासून श्रीराम जन्मोत्सव सोहळयास संत महंतांच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ होणार असून भाविकांच्या स्वागतासाठी रामनगरी सज्ज झाली आहे.यानिमित्ताने श्रीराम साधना आश्रम परिसरात केलेली सजावट व देखावे भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा,वै. ह.भ.प. बन्सी महाराज तांबे, अजानबाहु योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज व सद्गुरु स्वामी प्रकाशगिरीजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व परमपूज्यनीय गुरुवर्य ह.भ.प.श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या श्रीराम जन्म सोहळयाच्या निमित्ताने दि.३० मार्च ते दि.६ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ६.३० ते ९.३० यावेळेत सोनई येथील भागवताचार्य साध्वी तुलसी दिदी यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत जगदगुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण होणार असून या पारायण व्यासपीठाचे नेतृत्व हभप रामकृष्ण महाराज काळे खामगावकर हे करणार आहे.तर होणाऱ्या किर्तन महोत्सवात रविवार दि.३० मार्च रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांचे सायंकाळी ४ ते ६ यावेळेत तर दि.६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी निमित्त सकाळी १० ते १२ यावेळेत महंत परमहंस मुक्तानंद महाराज वेल्हाळे संगमनेर यांचे किर्तन होणार आहे.सोमवार दि. ७ एप्रिल रोजी काल्याचे किर्तनाने श्रीराम जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.

रविवारी दि. ३० मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळयाच्या निमित्ताने श्रीराम साधना आश्रमामध्ये होणाऱ्या धर्म ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पंजाब येथील डेरीवाला आश्रमाचे प्रमुख महंत भुपेंद्रगिरीजी महाराज, हरिद्वार येथील पंचायती निरंजनी आखाडयाचे महंत ओंकारगिरी जी महाराज,मुंबई येथील महंत काशीगिरीजी बापू,गो भक्त बनबाबा मुंबई यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सकाळी १० ते १२ यावेळेत निघणाऱ्या शोभायात्रा मिरवणुकीस व त्यानंतर होणाऱ्या धर्मध्वजारोहन कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत हिंदू धर्म भूषण स्वामी श्री सुनीलगिरीजी महाराज यांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.