सलाबतपूर – परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने चैत्र शुद्ध २ सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय युवा संत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सलाबपूर(गोपाळनाथ नगर) तालुका नेवासा येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवात साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी सकाळी १०:३० वाजता महाआरती करण्यात आली तसेच दुपारी श्री स्वामी चरित्र सारामृत सामूहिक पठण यावेळी सेविकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले या वेळी स्वामी महाराजांच्या फोटोला फुले फळे पेढ्याचा नैवेद्य तसेच पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून स्वामींच्या प्रतिमेसमोर पुष्पहार तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती.

सायंकाळी ६:३०मिनिटे वाजता स्वामींच्या प्रतिमेची आरती करून उपस्थित सेवेकऱ्यांना तसेच सलाबतपुर (गोपाळनाथ नगर) परिसरातील ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने सलाबतपुर(गोपाळनाथ नगर) परिसरातील सेवेकरी तसेच सलाबतपुर(गोपाळनाथ नगर) परिसरातील नागरिक मोठ्या उत्साह मध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिना प्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व स्वामी सेविकाऱ्यांनी आपली सेवा श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने सलाबतपुर(गोपाळनाथ नगर) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा मध्ये रुजू केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.