ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
दारूबंदी

नेवासा | संभाजी शिंदे गेल्या दहा दिवसापासून चर्चेत असलेला विषय म्हणजे खेडले परमानंद येथील दारूबंदी.पाच दिवसापूर्वी महिलांनी सोनई पोलीस ठाण्यावर दारूबंदी साठी मोर्चा नेला होता .त्यानंतर पोलीस प्रशासनाने खेडले परमानंद येथील अवैध्य व्यवसायांवर धडक कारवाया केल्या .आज दिनांक पाच एप्रिल रोजी गावातील दारूबंदीचा विषय मार्गी लावण्यासाठी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी स्वतः उपस्थित राहून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना तंबी दिली. त्याचप्रमाणे महिलांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी दारू बरोबर मावा व गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारांचाही पोलीस निरीक्षकांनी समाचार घेतला.

दारूबंदी

यावेळी बोलताना माळी म्हणाले की भविष्यात दारू- मावा -विक्री करणारा इसम आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.दिवसेंदिवस घरगुती हिंसा वाढत चाललेल्या आहेत व त्यामुळे महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे ,गावातील अनेक प्रपंच उध्वस्त झालेले आहेत संबंधित गोष्टीचा विचार करून ग्रामस्थांनी जो दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याला माझा पूर्ण पाठूंबा आहे व भविष्यात राहील अशा शब्दात माळी यांनी गावाला अस्वस्त केले.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक सूर्यभान आघाव , महमंदभाई इनामदार , नानासाहेब केदारी , राजाबापु शिंदे, दगु बाबा हवालदार , दत्तात्रय बर्डे , तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब नबी शेख, उपाअध्यक्ष संदिप तुवर श्याम सुंदर केदारी ,रोहिदास बर्डे ,नानासाहेब शिंदे ,भाऊसाहेब शिंदे,

दारूबंदी

रवी बर्डे,कुंडलिक बर्डे , वाल्मिक बर्डे .ऋषिकेश भुजबळ , सागर भुजबळ , राधु माळी , विठ्ठल बर्डे, प्रकाश केदारी आधी आदि युवकांनी पाठिंबा दिला .यावेळी दारूबंदी महिला अध्यक्ष मार्या केदारी , उपाअध्यक्ष पुणम बर्डे , ताराबाई शिंदे , कमल शिंदे , गयाबाई शिंदे,सुशिला बर्डे , शंकुतला बर्डे , सविता दूशिंग , पुष्पा शिदे , वैशाली भुजबळ , विमल शिंदे, अर्चना शिंदे , कविता शिंदे ,मीना बर्डे ,अर्चना शिंदे , मिना बर्डे , अनिता बर्डे , सायली दुशिंग , शितल दुशिग , मंदा केदारी , अनिता केदारी आदि सह अनेक महिल उपस्तीत होत्या.

दारूबंदी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारूबंदी
दारूबंदी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारूबंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *