नेवासा – संत विचार व धर्म कार्य प्रचार प्रसारासाठी देत असलेल्या आध्यात्मिक योगदानाबद्दल पत्रकार सुधीर चव्हाण यांना सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर व श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते संत विचार व धर्म प्रचार कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेवासा तालुक्यातील मुकींदपूर शिवारातील रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संत विचार व धर्म प्रचार कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयाच्या प्रसंगी साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य,साध्वी दुर्गा दिदी,प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या राजयोगिनी वंदना दिदी,भागवत कथाकार अंकुश महाराज कानडे,ज्ञानेश्वर महाराज हजारे,राम महाराज काळे,कृषी आयुक्त प्रशांत गवळी,प्रकाश शेटे, अर्जुन सुसे,डॉ.संदीप कडू,उद्योजक विलास नांगरे,संजय गायकवाड,काँट्रॅक्टर सोनवणे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर वारकरी,महाराज मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.