ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कुत्री

मोकाट कुत्र्यांसह डुकरे व गाढवांच्या बंदोबस्ताची मागणी

नेवासा – नेवासा नगरपंचायत हद्दीत रविवारी आठवडे ‘बाजारच्या दिवशी मोकाट कुत्र्यांनी ८ ते १० बाजारकरुंना चावा घेतला असून शहरात फिरणारे व नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणारी मोकाट कुत्री व इतर जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी समर्पण फाऊंडेशनचे डॉ. करण घुले यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी म्हटले की, रविवारच्या आठवडे बाजारात समाधान लॉज शेजारी फिरणाऱ्या मोकाट कुत्र्याने सुमारे आठ ते दहा लोकांना चावा घेतला आहे. तातडीने या कुत्र्याचा बंदोबस्त करावा. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावयासाठी वेळोवेळी नगरपंचायतचे उंबरे नागरिकांनी झिजवले आहेत.

कुत्र्या

बाहेरून शहरांमध्ये कुत्रे आणून सोडले याबाबत नगरपंचायत प्रशासन अतिशय उदासीन आहे. शहराच्या दोनही पुलांजवळ खराब मास, व प्राणी अवशेष टाकले जातात. त्यामुळे कुत्र्यांची आणि डुकरांची संख्या रस्त्यावर वाढते आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकवेळा रस्त्यावर होणाऱ्या अपघातास ही कुत्री आणि डुक्करे इतर मोकाट जनावरे कारणीभुत असतात. मोकाट कुत्री, डुक्कर, गाढव व इतर जनावरे यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नेवाशाच्या मुख्य रस्त्यावरील दोन्ही पुलांजवळ व मेन रोडवर टाकल्या जाणाऱ्या मांस आदी घाणीचाही बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कुत्र्या
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कुत्र्या
कुत्र्या
कुत्र्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कुत्र्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *