आंनदवन संस्था, अभंग, आखाडे, मुंडे, बेल्हेकर, आरगडे, हुलजुते, डॉ. कानडे, सावंत, कल्हापुरे, गवळी यांचा समावेश
नेवासा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील जाणता राजा ग्रुप, सावता परिषद, समता परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता युवा समाज प्रबोधनकार वसंत हांकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे व. समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल जावळे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील साईश्रध्दा लॉन्स मध्ये आयोजित कार्यक्रमात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान महंत वेदांताचार्य गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के व जागृत शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी महंत श्री आवेराजजी महाराज यांचे शुभहस्ते कार्यगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख,आमदार विठ्ठलराव लंघे,माजी आमदार पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे,पोलीस निरिक्षक धनंजय जाधव,समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे,विभागिय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड,रावसाहेब जावळे,आनंदवन ससंस्थेचे अध्यक्ष उदय पालवे,सावता परिषद प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान महासचिव डॉ.राजीव काळे,महाराष्ट्र प्रभारी मयुर वैद्य, कॉ.बाबा आरगडे,कडुभाऊ काळे,आदित्य दहिवाळ, सरपंच .लताताई अभंग, स्वप्नाली क्षिरसागर यांचे प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे, समता परिषदेचे उपाध्यक्ष राहुल जावळे, युवानेते अमोल अभंग यांनी केले आहे.

कार्यगौरव पुरस्काराचे मानकरी…
ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग (सहकार), सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे (सामाजिक), मंडळ अधिकारी सरिताताई मुंडे (महसुल), रंजनाताई बेल्हेकर (शैक्षणिक), सरपंच शरद आरगडे (सरपंच), डॉ. कैलास कानडे (वैद्यकिय), भाऊसाहेब सावंत (साहित्य), मनोज हुलजुते (उद्योजक),तुकाराम कल्हापुरे (कृषी), चंद्रहास गवळी(समाजप्रबोधन), पसायदान-आंनदवन-सोनई (सेवाभावी संस्था).


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.