नेवासा – श्री ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा यांच्या वतीने गोशाळा चालवण्यात येत आहे . या गोशाळेत सध्या आठ गाई व वासरे आहेत . यामध्ये गावरान व गीर जातीच्या गायी आहेत . या गोशाळेचा खर्च सध्या देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे .
या गोशाळेसाठी कडबा कुट्टी मशीन , सिमेंट काँक्रीटची दावन, कडबा , मका , मुरघास याची आवश्यकता आहे . ज्या भाविक भक्तांना गो सेवा म्हणून वस्तुरूपी वा आर्थिक मदत करायची आहे त्यांनी कृपया देवस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने हरिभक्त परायण वेदांताचार्य श्री देविदास महाराज मस्के यांनी केले आहे .
आपल्या घरातील मंगल कार्य , वाढदिवस वा स्मृतिदिन या निमित्ताने आपण या गो सेवेत आपला सहभाग नोंदवू शकता असे आवाहन श्री ज्ञानेश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे .
आपले नम्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष व विश्वस्त मंडळ


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.