देवगड फाटा – दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी, अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जळके बु. हद्दीतील नायरा कंपनीच्या कुलस्वामिनी पेट्रोल पंप आणि हॉटेलच्या परिसरात सांडपाणी चारीत न जाता साचत असल्याने, तेथील कर्मचारी अशोक जगदाळे, सौरव गणेश भांगे आणि पंपाचे मालक गोरखसिंग किसनसिंग चव्हाण हे तिघे चारीकडे गेले होते.
यावेळी, अनिल अशोक जगदाळे आणि सौरव भांगे हे दोघे खोऱ्याच्या सहाय्याने चारीत साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करत असताना, नकुल विलास झगरे आणि सुनील भाऊसाहेब झगरे हे दोघेजण तेथे आले. त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली.

घटनेचा गोंगाट ऐकून दीपक झगरे, बाळासाहेब जगन्नाथ झगरे, आकाश बाळासाहेब झगरे, भारत जगन्नाथ झगरे, रावसाहेब झगरे आणि सागर विलास झगरे हेही घटनास्थळी आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि मालकाला भविष्यात पंप व हॉटेलचे सांडपाणी चारीत सोडू नये, असे स्पष्टपणे बजावले.
या घटनेनंतर, अनिल अशोक जगदाळे (वय ४०, रा. जळके बु.) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात नकुल झगरे आणि सुनील झगरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३८/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३६२, ३(५) तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (ॲट्रॉसिटी) प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३(१)(r)(i), ३(२)(v-a) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुनील पाटील (शेवगाव) करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.