ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
संतोष खाडे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना व स्पर्धा परीक्षा देताना कोणताही न्यूनगंड बाळगू नये आपण इंग्लिश मीडियम मध्ये शिकलो नाही व आपण ग्रामीण भागातील आहोत ही तमा न बाळगता जिद्द चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर आकाशाला गवसणी घालून आपल्या आई-वडिलांचे कष्टाचे चीज करावे बारावीनंतर माझ्या ऊसतोड आई-वडिलांच्या हातातील कोयता बंद करायचा हा निर्धार मनी बाळगून आज ग्रामीण भागातील असूनही नेवासा येथे डीवायएसपी पदावर हजर झालो हाच निर्धार सर्व विद्यार्थ्यांनी बाळगावा व आई-वडिलांना सुखी करावे असे प्रेरणादायी विचार भानसहिवरे येथील प्राथमिक शाळेत स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले

संतोष खाडे

याप्रसंगी व्यासपीठावर नेवासा पंचायत समितीचे मा.उपसभापती किशोर जोजार मा.सरपंच अशोकशेठ बोरा,शिक्षण विस्तार अधिकारी रुकसाना शेख केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे डॉ.जे ई नरवडे डॉ.संतोष ढवान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.अशोक भोईटे माजी मुख्याध्यापिका सुनंदा इधाटे मुख्याध्यापक रामचंद्र गजभार,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कीर्तने,भोईटे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य संदीप तळपे उपस्थित होते. पुढे मार्गदर्शनपर बोलताना त्यांनी सांगितले की मी कोणी श्रीमंताचा मुलगा नाही तर एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे मी डीवायएसपी होऊ शकतो तर कोणीही गरीबाचा मुलगा डीवायएसपी होऊ शकतो मुलांनी फक्त दररोज शाळेत यायचे आहे शिक्षकांनी दिलेल्या स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आई-वडिलांना कामात मदत करायची आहे चांगले बोला वाईट बोलू नका शाळेतील संस्कार चांगले रुजतात वाईट कर्माची फळे भोगावे लागतात प्राधान्यक्रम ठरवून कामे करा यश निश्चित मिळते असा विश्वास त्यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिला .

संतोष खाडे

यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा चांगला क्लास घेतला टीव्ही पहाणार का?टुकार मुलांबरोबर फिरणार का?भांडण करणार का? पुस्तके फाडणार का? स्वाध्याय पूर्ण करणार का? या प्रश्नांची मुलांनी हजरजबाबीपणाने समर्पक दिलेली उत्तरे ऐकून भानसहिवरे गावातील लोक सुशिक्षित आहेत व शाळेतील मुले ही हुशार आहेत असे गौरव उद्गार काढले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला मुलेही आनंदी झाली. याप्रसंगी इयत्ता पहिली मध्ये नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसह सर्वांची स्वराज्यसौदामिनी ढोल पथकाच्या गजरात व सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक काढून शाळा प्रवेशोत्सव व चौथीच्या मुलाचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किशोर भाऊ जोजार उपसभापती यांनी विद्यार्थ्यांना 25000 रुपये किमतीचे दप्तर, पाटी, अंकलिपी असे शालेय साहित्य वाटप केले. मातोश्री हॉटेलचे संचालक दत्ता शेठ नवले यांनी विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांना सुरुची भोजन दिले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ.रेवननाथ पवार सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

संतोष खाडे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संतोष खाडे
संतोष खाडे
संतोष खाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संतोष खाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *