नेवासा – 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तालुक्यातील सर्व भीम अनुयायांनी एकत्र येऊन जयंती साजरी करावी असे आवाहन आरपीआयचे शहर प्रमुख पप्पू इंगळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. बाबासाहेबांच्या शिकवणीतून तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि तुमचे स्वप्न साध्य करण्यासाठी नेहमीच प्रेरणा मिळत राहील.

महामानवाचा सामाजिक लोकशाहीचा मार्ग आपल्याला समतेवर आधारित जग निर्माण करण्याची नेहमीच प्रेरणा देत राहील ,असे त्यांनी यावेळी सांगितले. दिनांक 16 रोजी नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच दिनांक 23 रोजी आंबेडकरनगर या ठिकाणी सर्व भीम अनुयायांनी एकत्र येऊन मिरवणुकीमध्ये सामील होऊन आनंद साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.