[t4b-ticker]

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

[metaslider id="12863"]
जगदंबा देवी

नेवासा – नेवासा तालुक्यातील गोमळवाडी येथील जोगेश्वरी जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त परीक्षावीधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी देवीची आरती करून यात्रेचा शुभारंभ केला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत श्री. खाडे यांचे ग्रामस्थांनी धुमधडाक्यात स्वागत केले.यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे यात्रेकरूंना आवाहन करताना गुन्हेगारांना माफी नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

ग्रामीण भागातील तरुणांनी स्वतःला कमी न समजता योग्य कष्ट घेतल्यास मोठ्यातले मोठे यश खेचून आणता येते, असे मार्गदर्शन तरुणांना केले. उपअधीक्षक गावात आलेले समजताच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी गावातून पळ काढल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी ॲड .सुदाम ठुबे, जवान रामेश्वर माकोने, अहिल्यानगर जिल्हा न्यायालय येथे कार्यरत असलेल्या सुरेखा गर्जे ,प्रवीण गर्जे यांचे हस्ते श्री. खाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटीचे निवृत्ती आरसुळे, गोपीनाथ गर्जे,सिताराम गर्जे,गोविंद ठुबे, प्रकाश ठुबे, बाबू गाडेकर, बाळासाहेब गाडेकर आणि इतर सदस्य हजर होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *