रायचुर जिल्ह्यातील बेंदोनी गांवची मंजुला मेगामुखीने केला २५ मार्चपासून पायी प्रवास सुरु!
नेवासा – महीलांवरील होणारे अत्याचार आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगूर तालुक्यातील बेंदोनी गावची तीस वर्षिय युवती मंजुला मेगीमुखा हिने थेट चक्क दिल्लीकडे आपली पायीवारी सुरु केलेली असून शनिवार (दि.१२) रोजी तीने श्रीक्षेञ देवगड देवस्थान येथे भेट देत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे दर्शन घेवून आपल्या याञेच्या पुढील टप्याचा प्रवास सुरु ठेवला आहे.

महीलांवरील मोठ्या प्रमाणात वाढते अत्याचार आणि भ्रष्टाचार या विरोधात या युवतीने २५ मार्चपासून आपली दिल्लीकडे पायीवारी सुरु केलेली असून दररोज ही युवती सुमारे ५० किलोमीटर पायी अंतर पार करत आहे शनिवार (दि.१२) रोजी मंजुला हिने श्रीक्षेञ देवगड, प्रवरासंगम मार्गे गंगापूर येथे भेट दिलेली असून त्यानंतर तीने लासूर,कन्नड आणि वेरुळ मार्गे तीने आपला पुढील प्रवासास सुरुवात केलेली आहे या दैनंदिन सुरु असलेल्या या प्रवासात ही युवती विविध गावांमध्ये थांबून महीला व नागरिकांशी सुसंवाद साधत आहे आणि तीने सुरु केलेल्या आपल्या लढ्याचे महत्त्व सांगत असून या लढ्याला जनतेतून मोठा पाठींबा तीला मिळत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.