नेवासा – नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीचे औचित्य साधून सुरू असलेल्या त्रिदिनात्मक धार्मिक सोहळा उत्सवाची सांगता त्रिवेणीश्वर महादेव देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या शनिवारी रात्री झालेल्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.सांगता कार्यक्रम प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी यावेळी भेटी देऊन हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. सुरेशनगर येथील हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाशासाठी हनुमंतरायासारखी ताकद ही ठेवावी लागते असे सांगून त्यांनी आजच्या तरुणांमध्ये ताकद व बुद्धीचे बळ चांगल्या सत्कर्मासाठी हनुमंतरायांनी द्यावी असे साकडं त्यांनी यावेळी बोलतांना घातले.

आपल्याकडून कोणतेही वाईट कर्म घडणार नाही असे तरुणांनी आचरण करावे असे आवाहन यावेळी बोलतांना केले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या पुनर्वसित गावांचा मुद्दा विधानसभेत आपण मांडला त्यास मंजुरी मिळवून निधी ही उपलब्ध झाला आता जी गावे पुनर्वसित मधून वगळली त्या गावांचा समावेश करून त्यांना देखील निधी कसा उपलब्ध करता येईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली. यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी आलेल्या भाविकांचे व मान्यवरांचे सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ यांनी स्वागत केले सोहळा कमिटीचे मार्गदर्शक विठ्ठल पाषाण यांनी प्रास्ताविक केले.

गुरुवर्य रमेशानंदगिरीजी महाराज यांचे संतपूजन सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आले तर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व जिल्हा पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा यावेळी सोहळा कमिटीच्या युवक सदस्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. काल्याच्या किर्तन प्रसंगी महंत रमेशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना आमटी भाकरी व लाडूंचा महाप्रसाद वाटण्यात आला.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी झालेल्या सांगता प्रसंगी मुकिंदपूरच्या सरपंच सौ.कल्पना सतिष दादा निपुंगे,हंडीनिमगावचे सरपंच भिवाजी आघाव,शिवाजीराव साळुंके,रघुनाथ पिटेकर, भागचंद पाडळे,एस सी बीचे ज्ञानेश्वर शिंदे,शरद शेटे,भीमा चव्हाण,उपसरपंच नाथा बाबर,

साहेबा सावंत,बबन शेटे, दिलीप शेटे,भगवानराव दळवी,बाळासाहेब उभेदळ, अविनाश उभेदळ,जिजा उभेदळ,दत्तात्रय उभेदळ,पंडित उभेदळ,बबलू डांगे,बापू शेगर,विजय बाबर,अशोक साळुंके,शिवाजी वाळके,अशोक खंडागळे खंडूभाऊ निकाळजे,बाबा मिसाळ,हर्षद पाटील,विनोद निकाळजे, सतीश क्षीरसागर,अक्षय विधाटे,विजय उभेदळ यांच्यासह तरुण मंडळाचे सर्व स्वयंसेवक पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.