नेवासा – 14 एप्रिल रोजी नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये इच्छा फाउंडेशन च्या अध्यक्षा मनीषा देवळालीकर (सिन्नरकर),सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजय दहिवाळकर,न्यू फ्रेंड्स कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आदेश साठे तसेच प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे यांचे हस्ते आणि आमदार विठ्ठलराव लंघे सरपंच सतीश दादां निपुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .यावेळी हिवाळे सर, भास्कर मामा लिहिणार, शिवाजीराव कोलते, गणपत मोरे, विजय अंकल गायकवाड, प्राध्यापक सातोरे सर यांची भाषणे झाली

तर डॉ .सचिन साळुंके, पप्पू इंगळे,डॉ. विजयकुमार आवारे, पप्पू कांबळे, सनी पाटोळे, विजय गाडे, नंदू वाकडे,माधव ननवरे, अनिल ताके, गणेश झगरे, आगळे सर ,थोरात सर ,गायकवाड सर ,कांबळे सर, अजय शिंदे आदींनी उपस्थिती लावली.यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की,महामानवाच्या जयंतीदिनी या संस्थांनी रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो अशा प्रकारचे कौतुकास्पद कार्य निश्चित भूषणावह आहे.या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथील लोकमान्य ब्लड बँकेच्या डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांनी योग्य असे नियोजन केल्याने कुठल्याही प्रकारची अडचण कार्यक्रमात आली नाही याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.

तसेच दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्यास आपले कायम सहकार्य राहील असे डॉक्टर केशव वाघ यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील आदेश साठे यांनी केले.चौकट….डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळीच पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम अनुयायी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.