नेवासा – नेवासा शहरात दीड महिन्यापूर्वी झालेल्या अतिक्रमण मुळे व्यवसायिकांची खूपच अडचण झाली आहे. गावातील जवळपास 70-80% बाजारपेठ शासकीय जागेत असून गावात अन्य पर्यायी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे बस स्टॅन्ड समोरील जिल्हा परिषद च्या जागेवर लवकरात लवकर व्यापारी संकुल उभारून प्राधान्याने जे गाळे धारक आहे त्यांना गाळे उपलब्ध करून द्यावे.सर्व व्यापारी जिल्हा परिषद च्या अंदाज पत्रक प्रमाणे आगाऊ रक्कम भरण्यास ही तयार आहेत आशा मागणीचे निवेदन आज सर्व व्यापाऱ्यांनी दिनांक 15-04-25 रोजी पंचायत समिती व आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिले.

आमदार विठ्ठल राव लंघे यांनीही यात तत्परतेने लक्ष घालून व्यापारी संकुल चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी महेश मापारी व कुणाल मांडण यांनी सांगितले की जर जिल्हा परिषद च्या जागेत मोठे व्यापारी संकुल उभारले तर जवळपास 100-150 गाळे तयार होऊन नेवाशातील गळ्यांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात सुटू शकतो व अशाच पद्धतीने बाकी शासकीय जागेत ही व्यापारी संकुल उभारल्यास नेवाशाची बाजारपेठ पण विस्तृत होऊ शकते. यासाठी लवकरच व्यापारी संघटना व कमिटी बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवेदन देताना दत्तात्रय तागड,रमेश शिंदे,शंकर नाबदे, ओमप्रकाश शर्मा, नानासाहेब जाधव,मनोजकुमार भोसे,सचिन कडू,शुभम डहाके,ओम यादव, मनोज कपिले व इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.