ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
संतोष खाडे

नेवासा – नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व कै.सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयात आज दि.१५ एप्रिल २०२५ रोजी नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्रभारी प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षक बाळासाहेब पवार, जयदीप जामदार,पत्रकार मकरंद देशपांडे, युसुफ शेख, अशोक कहार, सुनील धस आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम शाल व बुके देऊन दोन्ही विद्यालयांच्या वतीने मा. संतोष खाडे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील सेवक श्री.अशोक कहार यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा गौरव करण्यात आला.

संतोष खाडे

याप्रसंगी विद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी अमोल दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माझ्या आई-वडिलांच्या हातातील कोयता बंद करायचा आहे. या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन डीवायएसपी झालेला ऊसतोड कामगाराचा मुलगा आज तुमच्यासमोर उभा आहे. प्रेरणा दोन प्रकारच्या असतात .लाल दिव्याची दिसणारी गाडी ही माझी खरी प्रेरणा नव्हती तर उसाच्या फडात जनावरासारख्या राबणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या हातातील कोयता बंद करणे, ही माझी खरी प्रेरणा होती. गेल्या पंचवीस वर्षात एकही दिवाळी मी आई-वडिलांसोबत साजरी केली नाही. ऊस तोडीला गेलेल्या आई-वडिलांशिवाय सहा-सहा महिने एकटेपणाने किंवा शेजाऱ्यांकडे राहत शिक्षण पूर्ण केले. ध्येय गाठल्याशिवाय नातेवाईक किंवा समाजाला भेटलो नाही.

संतोष खाडे

अनेक वेळा अपयश आले तरीही खचलो नाही. तेव्हा हे यश मिळाले आहे. असे सांगत त्यांनी विद्यार्थी-शिक्षकांच्या मनात नवचेतना निर्माण केली. आता मी नेवासा पोलीस स्टेशन चा कार्यभार स्वीकारला आहे, तेव्हा येथून पुढे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणीही त्रास दिल्यास थेट मला संपर्क करा असे सांगत आपला संपर्क क्रमांक त्यांनी सर्वांना उपलब्ध करून दिला. प्रेमात पडायचेच असेल, तर आपले आई, वडील, संत, देशभक्त व पुस्तकांच्या प्रेमात पडा. असा मौलिक संदेश परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सुमारे एक तासाच्या भाषणात त्यांनी आपल्या जीवन प्रवासातील अनेक प्रसंग सांगून उपस्थितांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले तर आभार सुनील धस यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल भणगे, राजेंद्र चारूडे, रोशन सरोदे, प्रकाश पटेकर, सुधीर बोरकर, बाबासाहेब डौले, सूर्यकांत बर्डे आदींनी परिश्रम घेतले.

संतोष खाडे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संतोष खाडे
संतोष खाडे
संतोष खाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संतोष खाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *