नेवासा – महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे आराध्यदैवत असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवास गुरुवार दि. १७एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यात्रा महोत्सव नियोजनासाठी प्रशासन मंदिर समिती तसेच स्थानिक प्रशासन सरसावले आहे. येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी ग्रामस्थ यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

गुरुवारी दि.१७ एप्रिल रोजी युवक भाविकांनी कावडीने आणलेल्या पवित्र गंगा जलाने महालक्ष्मी देवीला अभिषेक घालण्यात येईल. रात्री आठ वाजता मंदिरामध्ये वेदमंत्राच्या जयघोषात होमहवनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कहार व भोई समाजाच्यावतीने पैठण येथून आणलेल्या पालखीची
मंदिर समिती व गावकऱ्यांच्या वतीने विधिवत पूजा केली जाईल. पालखीची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन श्री महालक्ष्मी देवी मंदिर ट्रस्ट प्रशासनाकडून शिस्तीत व रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी काळजी घेतली जात आहे. यात्रा काळात भाविकांसाठी नेवासा, शेवगाव, गंगापूर, श्रीरामपूर, नगर आदी ठिकाणांहून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापकाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून सहकार्य करण्याचे आश्वासन परिविक्षाधीन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दिले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.