
नेवासा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेवासा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या वेळी दंगलकार कवी नितीन चंदनशिवे व कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विधीतज्ञ संजय सुखदान यांनी केला.

प्रबोधनपर भाषणात चंदनशिवे यांनी आपल्या विनोदी आणि मार्मिक कवितांमधून युवकांनी चळवळीतील आदर्श महापुरुषांचे जीवन कसे अंगीकारावे, याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. “मनगटात शिवाजी महाराज अन् मेंदूत बाबासाहेब पाहिजे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनीही युवकांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला नेवासातील नागरिकांनी आणि बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण आणि प्रा. देविदास साळुंखे यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.