नेवासा – सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील रांजणी गावातील सुशालाबाई केशव चव्हाण वय वर्ष ८० आपली देवगड देवस्थान वरील श्रद्धा व गुरुवर्य बाबाजी व गुरुवर्य स्वामीजींवर व गोमातेवरील श्रद्धा या श्रद्धेपोटी रांजणी येथील या आजीबाईने आपल्या कष्टातून कमावलेल्या पैशातून एक टन ५० किलो वजनाचा ऊस गोमातेसाठी दान केला.
या आजीबाईने काही दिवस लोकांच्या शेतामध्ये भर उन्हातान्हात कांदा काढण्याचे काम करत होत्या त्याच कांदा काढणीच्या कामातील पैसे साचून ठेवत आपण गोमातेची सेवा करावी या भावनेतून त्यांनी गोमाते बद्दल हा सेवाभाव देवगड देवस्थान येथे अर्पण केला .

यावेळी देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी आजीबाई सुशीलाबाई केशव चव्हाण यांचा श्री क्षेत्र देवगड देवस्थानच्या वतीने श्रीफळ देऊन आभार व्यक्त करत देवस्थानच्या वतीने आजीबाईचा सन्मान केला.
यावेळी सुदाम पंढरीनाथ माताडे हे त्यांच्या गाडीमध्ये हा एक टन 50 किलो वजनाचा ऊस स्वखर्चाने घेऊन आले व आजीबाईंना त्यांच्या या भक्ती कार्यामध्ये हातभार लावला या आजीबाईचे देवस्थानच्यावतीने तसेच तालुक्यामध्ये भक्तमंडळीच्या वतीने कौतुक केले जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.