ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शेतकरी

देवगड फाटा – जलसंपदा विभागामार्फत राज्यात 15 ते 30 एप्रिल,2025 या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथे या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रम निमित्त शेतकरी संवाद मेळावा सोमवारी दि 21 रोजी आयोजित करण्यात आला, जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन आज अटल बिहारी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सभागृहात पार पडले.या प्रसंगी खडका शाखा परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेतकरी

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पाटबंधारे विभागाचे नेवासा उप विभागीय अभियंता अक्षय कराळे ,होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अटल बिहारी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज चे अध्यक्ष प्रशांत देसरडा होते तर व्यसपीठावर पाटबंधारे विभागाचे नेवासा उप विभागीय अभियंता अक्षय कराळे ,सरपंच कैलास झगरे, शाखा अभियंता प्रवीण नागापूरे, शाखा अभियंता वर्षां चोरमुगें ,दगडू बाचकर,शशी शेखर भोरे,,बाबासाहेब आखाडे, ऍड पागिरे, उप प्राचार्य श्री दुगट्ट,राजेंद्र सुसे उपस्थित होते

पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अभियंता नेवासा अक्षय कराळे बोलताना म्हणाले की . जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 हा कार्यक्रम शासनाच्या वतीने दि.15 ते 30 एप्रिल दरम्यान राबविण्यात येत आहे. जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, कारण वाढत्या लोकसंख्येमुळे, प्रदूषणामुळे, आणि हवामान बदलांमुळे पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. जल व्यवस्थापनामुळे आपण पाणी वाचवू शकतो आणि भविष्यात पाण्याची टंचाई टाळू शकतो.शेतीसाठी आधुनिक जलव्यवस्थापन तंत्रज्ञान वापरावे, जसे की ठिबक सिंचन.

शेतकरी

लोकसहभाग आवश्यक आहे. लोकांमध्ये जाऊन पाणी वापराचे नियोजन आणि बचत यासाठी जण जागृती करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन जल व्यवस्थापन कृती आराखड्यात सहभागी व्हावे.तसेच थकीत पाणी वापर संस्थेना चर्चा करून मार्ग काढूअसे सांगितले

कार्यक्रमा प्रसंगी प्रशांत देसरडा बोलताना म्हणाले की जल व्यवस्थापन केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिण्याचे पाणी, सिंचनासाठी पाणी, उद्योगांसाठी पाणी असे नियोजन करणे महत्वाचे आहे या व्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग असणे तसेच पाणी वापराचे बचतीचे शेतकऱ्यांना ज्ञान असणे गरजेचे आहे या मुळे शेतकऱ्यांना पाणी वेळेवर मिळेल व शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ होईल.

शेतकरी

उपस्थितांना जलव्यवस्थापनाविषयी माहिती दिली. उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली.

या प्रसंगी कालवा निरीक्षक नवनाथ शिरसाठ, कालवा निरीक्षक कोमल शिंदे,पाणी वापर संस्था सचिव राजू सुसे ,पत्रकार इकबाल शेख, नितीन दहातोंडे,संभाजी कुताळ, जळके खुर्द चे माजी सरपंच प्रकाश चावरे,राजेंद्र सुसे, बापू नाना शिंदे, रामेश्वर विठाटे, श्री गोरे,निवृत्ती थोपटे, दत्तात्रय हजारे, निलेश देहाडराय,भाऊसाहेब कोल्हे, शरद शेटे,भाऊसाहेब लोखंडे, बंडू नेहे,उपस्थित होते

newasa news online
शेतकरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेतकरी
शेतकरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!