अहिल्यानगर जिल्हा नेवासा तालुक्यातील गळनिंब हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले गाव. गावाच्या सुरुवातीलाच भैरवनाथाचे मंदिर आहे. ५१ फुटाचा कळस असून भव्य सभा मंडप आहे ,हे सर्व पाहून मन प्रसन्न होते. महाराष्ट्रात अनेक श्री कालभैरवनाथांची मंदिर असून त्यापैकी गळनिंब एक आहे. परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात कालभैरवनाथाची ३१ इंची भव्य मूर्ती असून रोज सकाळी व संध्याकाळी नियमित आरती केली जाते. गावातील सर्व भाविकांची दिवसाची सुरुवात श्री कालभैरवनाथाच्या दर्शनाने होते. दर्शनाने भाविकांची अपेक्षा व इच्छा पूर्ण होतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. चैत्र महिन्यातील शेवटच्या रविवारी श्री कालभैरवनाथाची यात्रा भरते. येथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन आनंद लुटतात.

या काळात मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.यात्रेच्या दिवसी रात्री कालभैरवनाथाची मिरवणूक निघून दुसर्या दिवशी बैलगाडा शर्यत होते. पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती .आम्हां हरीच्या दासा काही भय नाही. त्रयलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. काशीला भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर असून काशीला असलेले कपाल मोचन तीर्थ हे सर्व पापांचे शालन करण्याचे ठिकाण आहे.येथे प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते.

त्यामुळे गळनिंब येथील भाविकांची श्री कालभैरवनाथावर नितांत भक्ती असुन नवसाला पावणारे देवस्थान आहे अशी लोकांची श्रद्धा आहे.🙏🙏🚩🚩 या वर्षी यात्रेत दिनांक २०/०४/२०२५ सायंकाळी ६ वा. भव्य पालखी सोहळा
दिनांक २१/०४/२०२५रोजी सकाळी ११ वा.भव्य बैलगाडा शर्यत
दिनांक २२/०४/२०२५रोजी सायंकाळी ८ वा चित्रपट छावा
दिनांक २३/०४/२०२५रोजी सायंकाळी ८ वा.ऑर्केस्ट्रा कार्यक्रम संपन्न होणार आहे उपसरपंच विजय घावटे यांनी दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.