संदल, बिना, शोभेचे दारुकाम, हजेऱ्या व बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रम
नेवासा – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक गढीवरील नवाब कविजंग बाबा व तक्यासाहब यांचा जंगी उरूस सरपंच मीनाताई जोजार, उपसरपंच दत्तात्रय काळे व पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे.

तरुण मुले गंगेवरून कावडीने पाणी आणण्यासाठी आज बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी ५ वाजता जातील. उद्या गुरुवार दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता गावातील सर्व देवास गंगेचे पाणी पडेल व त्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन कविजंग बाबाच्या कबरीवर मनोभावे फुलांच्या चादरी वाहतात. त्याच दिवशी रात्री ८ वाजता गढीखालून संदल निघेल. त्यानंतर महिलांसाठी विशेष देखरेखीखाली स्वाती पुणेकर यांचा कार्यक्रम होईल. शुक्रवार दि. २५ रोजी सायंकाळी ८ वाजता छबिना निघून रात्री ९ वाजता शोभेच्या दारूचा सामना होईल.
परिसरातील सर्व दुकानदार, हॉटेल, हलवाई, खेळणीवाले, कटलरी, कलाकार, ढोलवाले, ताशावाले व बॅण्डवाले यांनी सदर यात्रेस येऊन यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन भानसहिवरा नवाब
कविजंग बाबा व तक्यासाहब यात्रा कमिटीने केले आहे.

यात्रा कमिटीच्यावतीने शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी मालती इनामदार यांचा लोकनाट्याचा मोफत कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. २६ रोजी सकाळी कलाकारांच्या हजेऱ्या ८ ते १० वाजेपर्यंत होतील. यात्रा पार पडण्यासाठी कमेटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, उपाध्यक्ष राजेंद्र नळकांडे, खजिनदार संदीप तळपे, बाबासाहेब ढवाण, नंदू जाधव, गणेश भुजबळ, गोरे मेजर, अनिल टाके, पवन जाधव, दीपक जाधव, संजय गोरे, निलेश मकासरे, पोपट शेकडे यांचेसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
शनिवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वा. पर्यंत बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी अंतर आणि नियम व अटींचे पालन करत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिलवान दानियाल मकासरे, किरण निपुंगे, सावळेराम कदम, केवल मकासरे, केवल आगडे, संतोष गुजर, अजिंक्य राऊत यांचे मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शर्यतीत पाचशे ते एकवीस हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत..


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.