नेवासा – जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन ची २०२५-२६ ची निवडणूक नुकतीच जाहीर झाली होती. सदर निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून अँड भारत वर्मा तर सहाय्यक म्हणून अँड पी के औताडे होते. महिला उपाध्यक्ष पदासाठी अँड वाखुरे यांचां अर्ज वगळता मुदतीत कोणताही अर्ज न आल्याने अँड सोनल वाखुरे यांची महिला उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. सर्व वकील संघातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांचेसह नेवासा विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ यांनी फोनवरून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. समर्पण फाऊंडेशन चे प्रमुख डॉ घुले यांनी देखील शुभेच्छा दिल्या. स्व. अँड के एच वाखुरें यांच्या त्या सूनबाई आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.