नेवासा फाटा – बालाजी सुर्यकांत मलदोडे, वय- 37 वर्षे, धंदा- नोकरी, नेम ग्राममहसुल अधिकारी देडगाव, ता. नेवासा, रा- नेवासा फाटा, ता. नेवासा, जि-अहिल्यानगर मोनं-8007121113.
समक्ष नेवासा पोलीस स्टेशनला हजर होवुन फिर्याद लिहुन देतो की, मी नेवासा तहसील कार्यालय येथे 09 वर्षापासुन नेमणुकीस असुन सध्या देडगाव येथे ग्राममहसुल अधिकारी म्हणुन कामकाज करतो.
आज दि. 23/04/2025 रोजी मा. तहसिलदार डॉ. संजय बिरादार यांनी लेखी आदेश क्र. कावि/पुनर्वसन /62-2025 दि. 23/04/2025 अन्वये आदेश देवुन मौजे देडगाव ता. नेवासा येथील शेती गट क्र. 779/15 या जमीनीचा बेकायदेशीर खरेदीविक्री व्यवहार झाला असुन त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशीत केलेले असुन खालीलप्रमाणे कागदपत्र माझ्याकडे सुपूर्त केले आहेत.

संदर्भ क्र. 1) कावि./पुनर्वसन / 272-2022 दि. 30/08/2022 अन्वये
संदर्भ क्र. 2) कावि./पुनर्वसन / 336-2022 दि. 29/09/2022 अन्वये
संदर्भ क्र. 3) दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील कायम खरेदी दस्त क्र. 2885/19
संदर्भ क्र. 4) मा. जिल्हाधिकारी कार्या. अ.नगर यांचेकडील पत्र क्र. कार्या. 26 क/433-23 दि. 20/11/2023
संदर्भक्र. 5) मा. अप्पर जिल्हाधिकारी अ.नगर यांचेकडील पत्र क्र. कुका./कक्ष 10 क/362010 (1)/2024, दि.14/03/2024 संदर्भ क्र. 6) मा. उपविभागीय अधिकारी अहमदनगर, यांचेकडील क्र. कावि/ अपील/ई 1878342-2024
संदर्भ क्र. 7) मा. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अहिल्यानगर यांच्याकडील पत्र क्र.कार्या 26 क/02-2025 दि. 06/01/2025
दि.06/08/2019 रोजी मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडील आदेश क्र. 26 क/66/2019 आदेश अहमदनगर दि. 28/01/2019 अन्वये

नुसार मौजे मुंगी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर येथील बाबासाहेब दामु थोरात, रा. खानापुर, ता. शेवगाव, जि.अहिल्यानगर यांची शेत जमीन गट नं. 566 / 2 मधील 0 हेक्टर 81 आर या क्षेत्राचा वर्ग 2 मधील जमीन वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेबाबतच्या मुळ आदेशामध्ये फेरफार करुन राजेंद्र रामदास वाघ रा. नेवासा फाटा यांनी चिमनाबाई दिनकर तेलधुने रा. देडगाव, ता. नेवासा यांचे कडुन त्यांचे मालकीचे शेत गट नं. 779/15 मधील 0 हेक्टर 59 आर शेतजमीनीचे मुखत्यारपत्र करुन घेवुन दिपक रमेश पातारे, रा. वडाळा बहिरोबा ता. नेवासा यांना खरेदी देवुन तसेच दिपक विनायक पाटील रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर व महादेव मुरलीधर मुंगसे, रा. देडगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना साक्षीदार म्हणुन हजर ठेवुन मा. अप्पर जिल्हाधिकारी सो तथा पुनर्वसन प्रशासक यांचेकडील मुळ आदेशामध्ये फेरफार करुन शासनाची फसवणुक करुन मौजे देडगाव येथील शेत गट क्र. 779/15 मधील 0 हेक्टर 59 आर ची खरेदी देवुन भोगवटादार वर्ग 2 मधील जमीनीचे वर्ग 1 मध्ये रुपातंरीत करण्यासाठी खोटे कागदपत्र सादर केले आहेत.

तरी दि 06/08/2019 रोजी 1. राजेंद्र रामदास वाघ रा. नेवासा फाटा 2. दिपक रमेश पातारे, रा. वडाळा बहिरोबा ता. नेवासा 3.दिपक विनायक पाटील रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर 4. महादेव मुरलीधर मुगसे, रा. देडगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांनी मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडील आदेश क्र. 26 क/66/2019 आदेश अहमदनगर दि. 28/01/2019 चे आदेशामध्ये फेरफार करुन बनावट आदेश तयार करुन तो खरा आहे असे भासवुन मौजे देडगाव ता. नेवासा येथील शेती गट क्र.779/15 मधील 0 हेक्टर 59 आर जमीनीचा बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार करुन शासनाची फसवणुक करुन दुय्यम निबंधक कार्यालय नेवासा येथे दस्त क्र 2885 / 19 अन्वये खरेदी विक्री केली आहे. म्हणुन माझी 1) राजेंद्र रामदास वाघ रा. नेवासा फाटा ता.नेवासा जि. अहिल्यानगर 2) दिपक रमेश पातारे रा. वडाळा बहिरोबा ता. नेवासा जि.अहिल्यानगर 3 ) दिपक विनायक पाटील रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर. 4) महादेव मुरलीधर मुगसे, रा. देडगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द सरकारतर्फे माझी कायदेशीर फिर्याद आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक काळोखे, पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.