गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील गणेश एकनाथ मिसाळ यांची मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांची सन. २००८ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांची उप. जिल्हाधिकारी म्हणून राज्यात दुसऱ्या क्रमांकाने निवड करण्यात आली होती. उप. जिल्हाधिकारी म्हणून सेवत रुजू झाल्यानंतर त्यांनी धुळे, जळगाव, चाळीसगाव, उप जिल्हाधिकारी भुसंपादन धुळे, उप विभागीय अधिकारी पाचोरा, उप विभागीय अधिक धुळे, उप जिल्हाधिकारी भुसंपादन विभाग क्रमांक २ नाशिक,अशा विविध ठिकाणी आपले उत्कृष्ट कार्य करत ते सन. १८ एप्रिल २०२३पासुन नंदुरबार येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कामकाज पहात होते.

तसेच त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव, महसूल प्रशासन, निवडणूक व्यवस्थापन, भुसंपादन, आपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण, कर्मचारी भरती प्रक्रिया, ७/१२ मालमत्ता पत्रक संगणकीरण, न्यायालयीन कामकाज, ई. गव्हर्नन्स, नाशिक कुंभमेळा सन. २०१५ व्यवस्थापन, अशासकीय संस्थासोबत कामकाज समन्वय म्हणून उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. तसेच उप जिल्हाधिकारी या पदावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी अहिल्यानगर येथे जिल्हा परिषदे क्रुषी विस्तार अधिकारी, राज्य कृषी परिक्षा गट ब मधील परिक्षेत राज्यात प्रथम, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक व्यवस्थापक मध्ये निवड, रिलायन्स इंडिया लिमिटेड कंपनी मध्ये क्रृषी पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड,महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सन २००८मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची उप जिल्हाधिकारी म्हणून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारी पदोन्नती देण्यात आली. तसे आशयाचे पत्र देखील त्यांना प्राप्त झाले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.