ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
स्वामी विवेकानंद

नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या कल्पनेने प्रहार साठी कार्यरत असणाऱ्या निरपेक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान होण्यासाठी शिवछत्रपतींचे कर्तबगार मावळे संताजी धनाजी यांच्या नावाने कार्यकर्ता सन्मान सोहळा महाराष्ट्र मध्ये आयोजित करण्यात आला आहें. कार्यकर्ता सन्मान कार्यकर्त्याची गुण ओळखून झाला पाहिजे यासाठी संत गाडगेबाबा, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वामी विवेकानंद यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर हा विभाग निर्माण करून यामध्ये बीड छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होता पक्षाची भूमिका सातत्याने वक्तृत्वताच्या माध्यमातून मांडणारी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांना स्वामी विवेकानंद सर्वोत्तम वक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वामी विवेकानंद

प्रहार जनशक्ती पक्षामध्ये कार्यरत असताना शेती आणि शेतकरी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यामागे भक्कमपणे उभा राहिल्याबद्दल तसेच नेवासा तालुक्यात संघटन निर्माण करून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रम छत्रपती संभाजी नगर येथे संत एकनाथ रंगमंदिर येथे हा कार्यक्रम प्रहार चे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते ऍड. पांडुरंग औताडे यांना देण्यात आला, यावेळे विभाग प्रमुख घनश्याम पेठे,व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मंचावर जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे, दक्षिण जिल्हा प्रमुख विनोद सिंग परदेशी, चि. प्रारब्ध औताडे व सर्व जिल्हाप्रमुख होते.

स्वामी विवेकानंद

पुरस्कारासाठी अहिल्यानगर येथून उपजिल्हाध्यक्ष आप्पासाहेब ढूस,संजय शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, श्रीरामपूर तालुका प्रमुख रघुनाथ शिंदे, कोपरगाव तालुका प्रमुख संदीप क्षीरसागर, नेवासा तालुका अध्यक्ष अनिल विधाटे सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ नवले, युवक उप जिल्हाप्रमुख संदीप पाखरे, अरविंद आरगडे, युवक संघटक सचिन साबळे, शहराध्यक्ष राम हरी शिरसाठ,संघटक अमोल जोगदंड,सचिन साठे,गजानन सांगळे प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वामी विवेकानंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!