नेवासा – आनंदाची बाब म्हणजे देहू आळंदी प्रमाणे आता माऊली कर्मभूमीतून देखील आषाढी माऊली पालखी सोहळा निघण्याचे निश्चित संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाने केले आहे आज वरूथनी एकादशी निमित्त माऊली पालखी सोहळ्याचे नियोजन बैठक झाली या बैठकीमध्ये गाथा मूर्ती राऊत बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुवर्य देविदास महाराज मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही नियोजन बैठक पार पडली

या नियोजन बैठकीसाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील काही संत मंडळी व दिंडी चालक हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते देहू आळंदी ज्या पद्धतीने आषाढी वारीचा माऊली पालखी सोहळा निघतो त्याच धर्तीवर ज्ञानेश्वर संस्थान यावर्षी पालखी सोहळ्याचे नियोजन आषाढी वारी निमित्त करत आहे त्यासाठी आज ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीसाठी संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ हे देखील उपस्थित होते व सर्वांच्या विचार विनिमयाने 26 तारखेला आषाढी वारीचा रूट फायनल होणार आहे त्यानुसार जून महिन्यामध्ये हा पालखी सोहळा निघणार आहे या पालखी सोहळ्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने मदत कार्य करावे हे देखील आव्हान देविदास महाराज मस्के यांच्या माध्यमातून करण्यात आले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.