ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सोसायटी

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील कारवाडी(पाचेगाव)येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी लोकसेवा मंडळाचे कट्टर कार्यकर्ते शंकर खंडू शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या संस्थेत एकूण ४५५सभासद असून संस्थेचे भागभांडवल ३३ लाख २२हजार रुपये इतके आहे. या संस्थेची निवडणूक जुलै २०२२ मध्ये पार पडली होती, त्यात मावळते अध्यक्ष जगन्नाथ तुवर यांनी कारभार पहिला.निवडणूक दरम्यान रोटेशन पध्दतीने अध्यक्ष बदलण्यात येईल याच धर्तीवर ९ एप्रिल बुधवार रोजी संस्थेच्या कार्यालयात ही निवडीची प्रक्रिया पार पडली.

सोसायटी

संस्थेत एकूण १३ संचालक आहे,या निवडी प्रसंगी संचालक भास्कर तुवर यांनी सूचना मांडली तर संचालक सीताराम तुवर यांनी अनुमोदन दिले.या निवडीत अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदें व सरपंच वामनराव तुवर यांनी महत्वाची भूमिका बजावली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष केशव शिंदे, दिगंबर तुवर, ताज शेख, सुधाकर तुवर, नितिन दहे,
संदिप गाडगे,शशिकांत मतकर,सौ. सुवर्णा पवार,श्रीमती मंदाबाई शिंगोटे तसेच संस्थेचे सचिव संजय नांदे,जगताप प्रल्हाद व आदी सभासद व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

सोसायटी
सोसायटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सोसायटी
सोसायटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सोसायटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!